Sponsor

Tuesday, December 21, 2010

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत



आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत




जीवनात अशा काही व्यक्ती येतात




जीवनात अशा काही व्यक्ती येतात आणि
अशी नाती बनवून जातात कि ती नाती विसरता येत नाहीत
आपलं नातं हि याचपैकी एक आहे - प्रेमाचं
मग मी तुला कसा विसरू शकतो!

तुझ्या आठवणी हळुवार पावलांनी माझ्या
हृदयाचे दरवाजे ठोकवतात माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर
तुझीच स्वप्न राज्य करतात मग, मी तुला कसा विसरू शकतो!
माझ्या ओठांवर सदैव तुझ्याच गोष्टी असतात
डोळ्यात तुझीच स्वप्न हृदयात तुझीच मूर्ती
मग, मी तुला कसा विसरू शकतो!


तुझ्याविना जगणं, हा विचारच मला सोसवत नाही
कारण, माझं अस्तित्व, माझं जीवन
माझं आयुष्य, माझं सर्वस्व तुझ्यावरच अवलंबून आहे
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
मित्रांसकट तुही म्हणालीस "मला विसर" म्हणून
पण तुला कसा विसरू हेच मला कोणी संगत नाही
मग, मी तुला कसा विसरू शकतो!

तुझा विरह सोसनं म्हणजे माझ्यासाठी तर ती
जीवघेणी शिक्षा आहे, तरीही तुझा विरह सोसेन मी
पण, पुन्हा बोलू नकोस मला विसर म्हणून
                                                            कारण मी तुला विसरू शकत नाही!
                                                            तुला विसरणं माझ्यासाठी फारच कठीण आहे
                                                            कारण माझं पाहिलं प्रेम तूच आहेस आणि
                                                            पाहिलं प्रेम विसरणं इतकं सोपं असतं का?
                                                            नाही ना...... मग तूच संग मला आता
                                                            मी तुला कसा विसरू शकतो!


लव्हलेटर

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणी बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणी ग्रामर नेहमीच राँग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणी जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खीशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणी खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबीट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबीट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!




लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
फिफ्टी सर्टन आणी फिफ्टीचं जजमेंट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेंड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तीसर्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं
दोघांपुरतच बांधलेलं सत्तर एम एम थिएटर असतं !

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे पहिला सिप असतं
चवीसाठी आतुरलेला टीनएजरचा लिप असतं
फेसाळलेल्या नशिबांसाठी हवाहवासा ग्लास असतं
आउट होतील त्यांच्यासाठी दुसर्‍या दिवशी त्रास असतं
झेपेल त्यानेच घ्यावी असं 'विदाऊट पाणी क्वार्टर' असतं 


Monday, December 13, 2010

माझे कॉलेज जीवन



कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..


त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."


एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली


शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली



Monday, December 6, 2010

का माझिया प्रियाला प्रीत कळेना








नि:शब्द … नि:शब्द

शब्दच आमुची शस्त्रे होती
गप्पांचे फड गाजवताना
शब्दांच्याच होत्या तलवारी
वाद-विवाद जुंपताना

असे आम्ही शब्दशूर
करून आमुचे शब्द म्यान
दाखल झालो मंडपी
घेऊन पांढरे निशाण

आता ‘त्या’ बोलत असतात
मी फक्त ऎकत असतो शब्द
काहीही बोललो तरी होतात वाद
म्हणून बरा मी … नि:शब्द … नि:शब्द